तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी व परीसरातील ग्रामपंचायतीच्या सर्व कारभार्यांचा कार्यकाल संपला असल्याने  ग्रामपंचायतीवर आता प्रशासकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली असुन ग्रामपंचायतीचा कारभार आता ग्रामविकास अधिकारी व नेमणुक करण्यात आलेले प्रशासकीय अधिकारी हे पहाणार असुन निवडणुका होईपर्यंत प्रशासक व ग्रामसेवक आता गावगाडा हाकणार आहेत.

      तुळजापुर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाल हा संपुष्टात आल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तामलवाडी व परीसरितील तामलवाडी,सुरतगाव,वडगाव काटी,पिंपळा बु.,पिंपळा खुर्द,देवकुरूळी,खडकी,कुंभारी,गोंधळवाडी,या ग्रामपंचायतीचा कारभार हाकणारे सरपंच ,उपसरपंच व सर्व सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल हा संपला आहे. देशासह राज्यामध्ये कोरोना संसर्गाने थैमान घातले असुन या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.पुढे निवडणुका कधी होणार सांगता येत नसल्याने पाच वर्षाचा कार्यकाल संपलेल्या या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,सदस याना मुदतवाढ न देता अशा ग्रामपंचायतीवर प्रशासकीय अधिकारी यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिल्याने पंचायत समितीमधील विविध विभागाचे विस्तार अधिकारी यांची या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.एका विस्तार अधिकार्यांकडे पाच ते सहा ग्रामपंचायतीचा कारभार सोपवण्यात आला असुन त्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे निवडणुका होईपर्यंत आता गावगाडा हाकणार आहेत.


 
Top