नळदुर्ग : एस.के. गायकवाड
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी पुकारन्यात आलेल्या लाँडाऊनमुळे गोर बंजारा समाजातील लोक कलावंतांना कार्यक्रमच नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.तरी शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी असी मागणी गोर बंजारा लोक कलावंत संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
गोर बंजारा कल्याणकारी संस्था प्रणित आँल इंडिया गोर बंजारा कलावंत संघटनेच्या वतीने कलावंत संघटनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष राजुदास जाधव ,शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात तुळजापूर तहसीलदार यांना विविध मागण्याचे एक लेखी निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की,गोर बंजारा समाजातील लोक कलावंतांना आर्थिक मदत करावी,६० वर्षा पुढील व्रध्द कलावंताना दरमहा अनुदानाची तरतुद करावी,हरीत क्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे,आदी सह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर कलावंत संघटनेचे तालुका प्रमुख राजुदास जाधव,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ गवळी,यूवा सेना प्रमुख सागर ईगंळे,शिवसेना तुळजापूर शहर उपप्रमुखघ बाळासाहेब शिंदे, येडोळा ग्रा.प.सदस्य शिवाजी नाईक,सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
