तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तुळजापुर तालुक्यातील आरळी बु येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक दिपक ज्ञानेश्वर सोनवणे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा कलाध्यापक वेल्फेअर सोसायटी धुळे आयोजित भारताचे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती व शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील एकूण 20 शिक्षक व शिक्षिका यांना राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण या वर्षी कोरोना महामारी मुळे प्रत्यक्ष रुपात कार्यक्रम न घेता पोस्टाच्या माध्यमातून सदरील शिक्षकांना घरपोच पोहोचवला जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी जाहीर केले आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कचरे,उपाध्यक्ष संजय गवळी सरपंच सौ.ज्योतीताई सुनील पारवे उपसरपंच व्यंकटराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष किरण व्हरकट, गोविंद पारवे आदींनी अभिनंदन केले आहे.
