उमरगा, दि. 04 : बालाजी विश्वनाथ मंडले, वय 50 वर्षे, रा. कराळी, ता. उमरगा हे दि. 31.08.2020 रोजी 10.20 वा. सु. उमरगा येथील पर्यायी रस्त्याच्या वळणावर मो.सा. क्र. एम.एच. 25 एस 9390 ही चालवत जात होते. दरम्यान कार क्र. एम.एच. 12 पीझेड 7361 च्या अज्ञात चालकाने कार निष्काळजीपणे चालवून बालाजी मंडले यांच्या मोटारसायकलला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात बालाजी मंडले हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या दशरत बाबुराव कलमले यांनी दि. 03.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top