तुळजापुर, दि. 26 : शहरातील सौ. पुष्पा अरुण कदंले वय वर्षे ६८ यांचे शनिवार दि. २६ रोजी पहाटे साडे तीन वाजता वाजता सोलापुर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

त्यांच्या पार्थिवावर सकाळी साडे नऊ वाजता वाजता येथील घाटशीळ रोड वरील स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आले. त्या भाजपाचे युवा नेते आनंद दले यांच्या मातोश्री होत. तर तुळजापुर नगरपरिषदेचे नगरसेवक विजय कदंले यांच्या त्या चुलती होत. त्यांच्या अचानक जाण्याने कंदले परिवारावर दुखाचा डोंगर कोसळ्याने त्या भागात राहणाऱ्या नागरीकामधुन हळहळ व्यक्त होत आहे.


 
Top