जळकोट : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील विद्यार्थी सेवा प्रकाशनचे संचालक, झटपट इंग्रजी व्याकरणचे महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, दुष्काळात टँकरद्वारे घरोघरी पाणी पुरवणारे पाणीदार नेते व भाजपाचे वरिष्ठ नेते भिमाशंकर हासुरे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय परिषद सदस्यपदी दुसऱ्यांदा फेरनिवड झाल्याबद्दल जळकोट येथे सत्कार करण्यात आला.

भीमाशंकर हासुरे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय परिषद सदस्यपदी दुसऱ्यांदा फेरनिवड झाल्याबद्दल जळकोट येथे विद्याधन  या त्यांच्या निवासस्थानी जळकोट येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने फेटा, शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर भीमाशंकर हासुरे यांचे सुपुत्र, युवा नेते श्रीकांत हासुरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.  यावेळी सत्काराला उत्तर देताना भीमाशंकर हासुरे म्हणाले की, शालेय जीवनापासून मायेचे छत्र हरवल्यानंतर सतत परिश्रम घेऊन घेतलेल्या कष्टामुळे मला पक्षात पदे मिळत गेली. मी माझ्या जीवनात  पुण्य  कार्य व सर्वसामान्यांची सेवावृत्ती अंगी बाळगून सामाजिक काम करत आलो आहे. यापुढे याच ध्येयाने आपण वाटचाल करणार आहोत. या पदाचा उपयोग आपण गावच्या विकासासाठी करणार आहोत. यासाठी आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो. हासुरे पुढे म्हणाले की, या पदाच्या माध्यमातून जे-जे चांगले करता येईल. ते करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. गावातील कार्यक्रमासाठी स्वतंत्र सभाग्रह उभारण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू. आपल्यावर असलेल्या प्रेमापोटी सर्वपक्षीय मिळून माझा सत्कार केलात. यामध्ये मी सदैव ऋणी राहीन.

या सत्कार सोहळ्याला तुळजाभवानीचे संचालक अशोकराव पाटील, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सचिव यशवंत कदम, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजकुमार पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष बसवराज कवठे, उपाध्यक्ष बबनराव मोरे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र कदम,माजी ग्रामपंचायत सदस्य शिवराज स्वामी, जि. प. कन्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर वाडीकर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विश्वनाथ कारले, मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. बाबुराव धुमुरे, निळकंठ औसेकर, श्रीनिवास पाटील ,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कदम, सोसायटीचे संचालक समाधान पाटील, सोसायटीचे सचिव राजशेखर माळगे, अंकुश लोखंडे, महादेव सावंत, अशोक बारदाने, अशोक मारुती कदम, विकास चव्हाण, तुकाराम हासुरे, निजाम इनामदार, विजय यादगौडा, प्रदीप धरणे, महादेव धरणे, बसवराज किरुणगी, जीवन कुंभार, संजय घोडके, बसवराज स्वने, लक्ष्‍मण पांचाळ, विश्वास भोगे, बालाजी पाटील, मल्लिनाथ पिचे, शिवा स्वामी, अनिल माळगे आदिसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top