उस्मानाबाद, दि. 14 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 163 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 550 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 8 हजार 697 झाली आहे. यातील 6 हजार 553 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 252 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 892 जणांवर उपचार सुरु आहे.