उस्मानाबाद, दि. 17 : उस्मानाबाद जिल्हयात आज गुरुवार दि. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 268 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 72 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 568 झाली आहे. यातील 6 हजार 871 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 269 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 428 जणांवर उपचार सुरु आहे.


