तुळजापुर : कुमार नाईकवाडी

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवार दि. १८ रोजी बँक आँफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक अमित सूतकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा पीककर्ज उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

शाखा व्यवस्थापक अमित हरिदास सुतकर यांनी सन 2020-21 च्या खरीप पीक कर्ज वाटपात शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी गरीब कष्टकरी शेतकऱ्यांशी सहकार्याची भूमिका घेत 11.25 कोटी रुपये कर्जाचे वाटप करून 82.42% उदिष्ट गाठण्या साठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याबद्दल उस्मानाबाद जिल्ह्यातील तमाम कष्टकरी शेतकऱ्यांच्या वतीने सुतकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे वंचित बहुजन आघाडीच्यवतीने सत्कार करण्यात आला.         

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे  मिलिंद रोकडे, जीवन कदम, सुरेश चौधरी, कमलेश कदम, नागेश कदम, नेताजी सोनवणे, विकास चंदनशिवे, बाळासाहेब राऊत, धम्मशिल कदम, राम मस्के आदी जण उपस्थित होते.

 
Top