अचलेर, दि. २६ : लोहारा तालुक्यातील अचलेर भीमनगर येथील कस्तुराबाई सिद्राम बनसोडे वय ८१ वर्षे यांचे सोमवार दि. २६ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे, पर्तुंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता अचलेर भीमनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे नातू सुमित बनसोडे यांनी सांगितले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 
Top