तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात भक्तीमय वातावरणात "आई राजा उदो उदो" च्या गजरात कुंकुवाची उधळण करीत फुलाची पुष्पवृष्टी करीत संबळाच्या निनादात श्री तुळजाभवानी मातेचे दि.२६ सोमवार रोजी सिमोल्लघंन संपन्न झाले. तर श्री तुळजाभवानी मातेच्या पाच दिवसाच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाले असून श्री तुळजाभवानी मातेची पाच दिवसाची श्रम निद्रा संपल्यानंतर कोजागिरी पोर्णिमेस पहाटे सिंहासनावर विराजमान होणार आहे.
ततपुर्वी श्री तुळजाभवानी मातेस पहाटे पंचामृत अभिषेक घालुन श्री देवीची मुख्य चल मूर्तीस १०८ साड्याचे दिंड गुंडाळून श्री तुळजाभवानी मातेच्या मुर्तीस गाभाऱ्यातुन बाहेर काढून नगरहुन आलेल्या पालखी मध्ये ठेवण्यात आले. पालखी घेऊन मंदिरा भोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घेण्यात आली. यानंतर मंदीरातील होमकुंडा जवळील पिंपळाच्या पारावरती पालखी विसावा घेतली. यानंतर श्री देवीजीस सोहळा आने भोपे पुजारी वर्गाच्या मानाच्या आरत्या दाखवुन श्री देवीजीस करंजा साखर भाताचा नैवेद्य दाखवून सिंह गाभाऱ्यातील असलेल्या लाकडी पलंगावर श्री देवीची मूर्ती ठेवुन पाच दिवसाच्या श्रम निद्रेच्या मंचकीस प्रारंभ झाला. त्यानंतर श्री देवीचे चरण तिर्थ होऊन दरवाजे उघडण्यात आले. यानंतर पलंगावरती सकाळी सुगंधी तेलाचे अभिषेक घालुन नित्योपचार वस्ञोअलंकार पुजा करुन धुपारती करण्यात आली.
नगर जिल्ह्यातील भिंगार भगत कुंटुबीयाचा व मानाच्या पालखीवाल्याचा तसेच माया प्रताप, दिवटे, मसाल, सेवेदार अंबादास औटी आदीसह मानाच्या लोकांचा श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्री देवीच्या या सिमोल्लंघना च्या धार्मिक सोहळ्यास श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे उपजिल्हाधिकारी रुपाली अवले, तहसीलदार सौदागर तांदळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, मुख्याधिकारी आशिष लोकरे, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, मंदीर कर्मचारी अभियंता प्रविन अमृतराव, श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य भोपे पुजारी, पाळीकर पुजारी, सेवेदार आदीसह नगर जिल्ह्यातील भिंगार पालखीवाले, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.