तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे सिमोल्लघंन झाल्यानंतर दि.२६ सोमवार रोजी तुळजापुर नगर परिषदेच्या वतीने विजया दशमीचे औचित्य साधुन तुळजापुर नगरपरिषद कार्यालयात नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या हस्ते प्रथम श्री देवीच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यालयातील दप्तराची पुजा करण्यात आली.

 यानंतर न.प. मधील स्वच्छता साहित्य, अवजारे, घंटागाडी वाहनाची पुजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक पंडीतराव जगदाळे, न.प.कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक, स्वच्छता ठेकेदार अविनाश रसाळ, न.प.चे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



 
Top