तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजा भवानी मातेच्या दरबारात दि.२६ सोमवार रोजी विजया दशमी दिनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्यासाठी रा.काँ युवक च्या वतीने यथा सांग पुजा करुन महाआरती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात अजित पवार हे लवकरात लवकर कोरोना पादुर्भावातुन बरे होवो, तसेच जनतेच्या सेवेसाठी सक्रीय होवो, त्यांना श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता शक्ती देवो, असे साकडे घालण्यात आले.
यावेळी रा.काँ.प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, प्रदेश सरचिटनीस तथा उस्मानाबाद जिल्हा प्रभारी प्रशांत बाबर, अरुण आसबे, रा.काँ.चे युवक चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष अमर चोपदार, रा.काँ.युवक चे शहर अध्यक्ष शरद जगदाळे, रा.काँ.विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश सांळुके, रा.काँ.चे सरचिटनीस शशीकांत नवले, कार्याध्यक्ष बाळासाहेब पेंदे, अल्पसंख्याकचे शहर अध्यक्ष तौफीक शेख, गणेश नन्नवरे, मकसुद शेख, समर्थ पैहलवान, महेश चोपदार, अशोक फडकरी, अभय माने, ओकांर चोपदार, अनमोल शिंदे आदीसह रा.काँ.चे कार्यकर्ते उपस्थित होते.