नळदुर्ग, दि. 27 : अणदूर येथील जेष्ठ नागरिक, विश्व हिंदू परिषदेचे क्षत्रिय धर्म प्रसार प्रमुख (दक्षिण कर्नाटक) पुर्णवेळ कार्यकर्ते (प्रचारक), अयोध्या श्रीराम मंदिर निर्मितीचे प्रत्यक्ष साक्षीदार स्व. भुजंगराव घुगे यांना मौजे खुदावाडी ता. तुळजापूर येथे ग्रामस्थांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
दि. 25 ऑक्टोबर रोजी रोजी विश्व हिंदू परिषदेचे दक्षिण प्रमुख भुजंगराव घुगे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी खुदावाडी ग्रामस्थाकडून सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गावचे समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे, सरपंच शरद नरवडे, उपसरपंच पांडुरंग बोंगरगे, महादेव सालगे, नागनाथ बोंगरगे, संगमेश्वर पाटील, सुधाकर घोडके, युवा परिषद तालुका अध्यक्ष केदारनाथ पाटील, निसर्ग सालेगावे, मनोहर अहंकारी, तुकाराम बोंगरगे, गुरुनाथ कबाडे, दिलीप सालेगावे, विक्रम सांगवे, राम बोंगरगे, अनंत अहंकारी, दगडू सालेगावे, वसंत सालगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.