तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात दि.25 रविवार रोजी भक्तीमय वातावरणात घटोत्थापन संपन्न झाले.
गेल्या नऊ दिवसापासुन श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शारदीय नवराञ महोत्सव भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. शारदीय नवराञ महोत्सवाच्या ९ व्या माळे दिनी म्हणजे रविवारी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरातील सिंह गाभाऱ्यातील घटोत्थापन करण्यात आले.
ततपुर्वी पहाटे श्री देवीचे चरण तिर्थ होऊन दरवाजे उघडण्यात आले सकाळी ६ वाजता श्री देवीजीस पंचामृत दुग्धा अभिषेक घालुन वस्ञो अलंकार चढविण्यात आले. त्यानंतर श्री तुळजाभवानी मातेची ९ व्या माळेची नित्योपचार पुजा करुन धुपारती करण्यात आली. त्यानंतर अनादी काळापासुन चालत आलेल्या रुढी परंपरे नुसार धनगर समाजाचे सिंदफळ येथील मानकरी गणपत गजेंद्र लाडंगे यांच्या मानाच्या अजाबली चे येथील होमकुंडावर दुपारी १२ वाजता तहसील चे शिपाई जिवन मोहनराव वाघमारे यांच्या हस्ते होमकुंडावर धार्मिक विधी करण्यात आला.
यानंतर श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरातील सिंह गाभाऱ्यातील गेल्या ९ दिवसापासून करण्यात आलेल्या घटस्थापनाचे संबळाच्या निनादात हळद , कुंकुवाची उधळण करीत घटोत्थापन करण्यात आले. या वेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजीबुवा महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे तहसीलदार सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, श्री तुळजाभवानी मातेचे पाळीचे मुख्य भोपे पुजारी धिरज प्रकाश पाटील, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव सांळुके, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे परमेश्वर, उपाध्ये पुजारी मंडळाचे अनंत कोंडो आदीसह भोपे पुजारी, पाळीकर पुजारी, श्री देवीचे सेवेदार अंबादास औटी, दयानंद औटी, दुर्गेश छञे, नितीन पोहेकर, अरुण पलंगे, अमर चोपदार, गणेश चोपदार, संभाजी चोपदार, श्याम चोपदार आदीसह मंदीर कर्मचारी उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मंदीरातील धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर शहरातील पुजारी बांधवाच्या वतीने श्री देवीजीस नैवेद्य दाखविण्यात आले. यानंतर शहरातील पुजारी बांधवाच्या व शहरातील नागरीकांच्या घरोघरी घटोत्थापन करण्यात आले. भक्तीमय वातावरणात श्री तुळजा भवानी मंदीराच्या दरबारातील शारदीय नवराञ महोत्सावाच्या खंडे नवमीचा सोहळा संपन्न झाला. दि.२६ सोमवार रोजी पहाटे विजया दशमीचा सोहळा होणार आहे.