काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रसिद्ध उद्योजक तथा पेपर विक्रेते विद्यासागर धोंडीबा ढगे यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर व मुलगा विनायक  विद्यासागर ढगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत येथील मुख्यबाजार चौकातील दुकानासमोर, घरासमोर, तसेच बाजार चौक परिसरात  संरक्षित जाळ्यासहीत अशोकाची व सप्तपर्णी वृक्षांचे वृक्षारोपण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 उद्योजक विद्यासागर ढगे यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे बाजार चौक परिसर हिरवागार व निसर्गरम्य होणार असून चौकाला शोभा येणार आहे. या त्यांच्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ढगे यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कौरोनाच्या पार्श्र्वभूमीवर पारले बिस्किटांचे विस बॉक्स, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले होते.

यावेळी सरपंच आदेश कोळी, सोसायटीचे चेअरमन विक्रमसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर, माजी सरपंच अशोक जाधव, उद्योजक विद्यासागर ढगे, डॉ. युसूफ मुजावर,  ग्रा.प. सदस्य बाळासाहेब भाले, शिवलिंग घाणे, अतुल सराफ, किर्ती जमदाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, मोतीराम आगलावे, अॅड. भैरीनाथ (काका) साळुंके, प्रा.भारत गुरव, अभिमान बामणकर, निवृती भोजने, नाबाजी ढगे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

 
Top