अचलेर, दि. ०७ : लोहारा तालुक्यातील अचलेर भीमनगर येथील ताराबाई चंद्राम माने वय ७९ वर्षे यांचे बुधवार दि. ७ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता अचलेर भिमनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे नातू सिद्धेश्वर माने यांनी सांगितले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
