काटी : उमाजी गायकवाड
सर फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धा 2020 मध्ये क्षेत्रीय अधिकारी गटातून तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांच्या बीटस्तरीय विशेष उपक्रम निधीतून बीटमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांचा सर्वांगीण विकास या उपक्रमाची निवड झाली आहे. या पुरस्काराचे वितरण सर फाऊंडेशन, स्टेम व जस्ट लर्निंगकडून डिसेंबर 2020 मध्ये आयोजित राष्ट्रीय स्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स 2020 मध्ये करण्यात येणार आहे.
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन ( सर फाउंडेशन) महाराष्ट्र यांच्यामार्फत देण्यात येणारे सर फाउंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड 2020 देशभरातील 169 प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना जाहीर झाले आहेत. या स्पर्धेत देशातील एकूण 16 राज्यातील प्रयोगशील शिक्षक व उपक्रमशील क्षेत्रीय अधिकारी यांचा समावेश असल्याची माहिती या फाउंडेशनच्या राज्य समन्वयक हेमा शिंदे, बाळासाहेब वाघ आणि सिद्धराम माशाळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. यामध्ये मंगरुळ ता. तुळजापूर बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी मल्हारी माने यांची निवड करण्यात आली आहे.
माने यांच्या निवडीबद्दल शिक्षण अधिकारी रामलिंग काळे, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
