तुळजापुर : कुमार नाईकवाडी

मराठा आरक्षण क्रांती ठोक मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांना पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी  तुळजापुर शहरातील अग्रवाल समाजाचे युवा उद्योजक दिनेश अग्रवाल यांनी स्विकारली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून  मराठा क्रांती ठोक मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवासाठी पिण्याच्या पाण्याचे जारची व्यवस्था करण्यात येणार असून यासाठी अंदाजे ५०० जार लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मराठा आरक्षण मोर्चाच्या समर्थनार्थ इतर समाज पुढे सरसावत असल्याचे समन्वयक सज्जन साळुंके यांनी सांगितले आहे. 

मराठा क्रांती ठोक मोर्चात सहभागी मराठा समाज बांधवासाठी पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी युवा उद्योजक अग्रवाल यांनी स्विकारला आहे. अग्रवाल यांच्या या निर्णयाचे मुख्य समन्वयक संज्जन साळुंके यांनी  सत्कार करून स्वागत केले.  यावेळी  धैर्यशील  कापसे, आण्णासाहेब क्षिरसागर अशोक फडतरी आदीची उपस्थिती होती.

मराठा आरक्षण मोर्चास इतर जाती, धर्मांचा पाठिंबा

तब्बल ५८  मोर्चे, प्रत्येक मोर्चा विक्रमी संख्येचा,  शांतता आणि स्वच्छतेचा आदर्श निर्माण करणा-या मराठा आरक्षण मोर्चाचा समर्थनार्थ  इतर समाज बांधव पुढे सरसावले असून मोर्चा ला जाहीर पाठिंबा देतानाच मोर्चा च्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण घालून देत आहेत. 

 
Top