तुळजापुर : कुमार नाईकवाडी
कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या नगरीतील तुळजापुर घाटातील अतिवृष्टी पावसामुळे मुळे झाडे कोसळली. दि. १४ बुधवार रोजी येथील आनंद कंदले मित्र मंडळाच्या वतीने प्रशासनाची वाट न पाहता तात्काळ जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजुला करुन रस्ता वाहतुक सुरळीत करण्यात आला.
यावेळी जे.सी.बी मालक दशरथ पवार यांनी विनामुल्य सहकार्य केले. तसेच यावेळी दिनेश बागल, सुलेमान शेख, आण्णा देवकर, लक्ष्मण देवकर, आजय धनके, सोमनाथ देवकर, तानाजी धनके, कुणाल रोंगे व मित्र परिवाराने सहकार्य केले.

