तुळजापुर : कुमार नाईकवाडी

कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये  जिल्ह्यातील अनेक पोलीस तुळजापुर शहरात बंदोबस्तासाठी आले आहेत. शहरातील अनेक भागात ठिकाणी छावणी करुन तुळजापुर शहर सुरक्षे साठी उभे आहेत. त्यांना जागेवर दररोज शुद्ध पाणी मिळावे म्हणून येथील आनंद कंदले मित्र मंडळाच्या वतीने पोलीस बांधवाना पुढील 10 दिवस पिण्याचे पाण्याची सुविधा पुरविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ दि.१७ शनिवार रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छावणीत समोर करण्यात आला. 

यावेळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, आनंद कंदले, सहा. पोलीस निरिक्षक राठोड, सहा पोलीस निरिक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रोटे, शांतीलाल घुगे, विशाल तिकोने, सोमनाथ देवकर आदीसह आनंद कदंले मित्र मंडळाचे सहकारी उपस्थिती होते.


 
Top