जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट बीटमधील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानमोडी शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिष्यवृत्ती२०२० या वर्षात शाळेतील विद्यार्थी कु. विवेक किरण गुंजकर तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेत सुरवसे कृष्णा तानाजी आणि आर्यन भास्कर सुरवसे या विद्यार्थ्यांने शंभर टक्के गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले. त्यामुळे शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी जेष्ठ नागरिक शिवराम सुरवसे, पालक किरण गुंजकर, मुख्याध्यापक विक्रम पाचंगे, प्राथमिक पदवीधर शिक्षक रमेश दूधभाते, रामकृष्ण मोहिते, श्रीमती सुचिता चव्हाण तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिपान गुंजकर, उपाध्यक्ष शुभांगी सुरवसे, सदस्य राजेंद्र चौगुले, सदस्य राजेंद्र गायकवाड, आशाताई गुंजकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले. सरपंच गोपाळ सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
