तुळजापूर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्यावतीने उस्मानाबाद जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल आगलावे यांची निवड करण्यात आली असून प्रदेश अध्यक्ष कल्याण दळे व जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या हस्ते यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आले.

उस्मानाबाद येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्यस्तरीय बैठक पार पडली यावेळी प्रदेश अध्यक्ष कल्याण दळे यांनी नाभिक समाजातील संघटन वाढवण्यासाठी यासाठी नवीन निवडी  करण्यात आलेल्या आहेत,या बैठकीत  प्रदेश संघटकपदी किशोर राऊत यांची तर मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पंडित आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल आगलावे यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.

या निवडीनंतर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भालेकर,ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष सुखदेव भालेकर,धनंजय राऊत,दाजीआप्पा पवार,व्यंकट पवार,प्रेमचंद गोरे,उद्धव क्षीरसागर, दादासाहेब राऊत, सतीश कसबे, डी.एन. कोळी, रवी कोरे यांच्यासह नाभिक बांधवांनी अभिनंदन केले आहे.

 
Top