तुळजापूर : कुमार नाईकवाडी
श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानने अकरा कोटी रुपये खर्च करुन मुर्ती उभी करण्याऐवजी भक्त व पंचक्रोषीतील जनतेसाठी सुसज्ज असे मल्टीस्पेशालिस्टी दवाखाना सुरु करण्याची मागणी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे व ॲड. शिरीष कुलकर्णी यांनी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 पार्श्वभूमीवर शासन राज्यात मोठमोठे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरु करत आहे. श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानकडे 150 कोटी रुपये पडून असल्याने याचा सकारात्मकपणे विचार करावा, या पैशाचा वापर भक्त व जनकल्याणासाठी व्हावा, तिर्थ क्षेत्र येथे मोठ्या संखेने भाविक येत असतात. यातील वृध्द, महिला यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने आपला जीव गमावावा लागतो. तरी वेळेवर उपचार मिळण्यासाठी याठिकाणी सुसज्ज रुग्णालय सुरु करुन अल्प दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असेही म्हटले आहे.
