तुळजापूर : कुमार नाईकवाडी

अधिक मासाचा पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी चरणी अधिक मासातील वारी पुर्ण करण्यासाठी मंञी, लोकप्रतिनिधी, त्यांचे मातपिता येवुन महाद्वारावरुनच देवीदर्शन घेवुन कुलधर्म कुलाचार करुन अधिक मासातील वारी देवी चरणी पुर्ण करीत आहेत. कोरोनाने  लहान-मोठे, गरीब-श्रीमंत ही  भेदभावाची दरी  दूर केला असुन सर्वजण एकाच  पातळीवर  आहेत हे दाखवून दिले आहे.

सध्या कोरोनाचा कहर असतानाही हे मोठी मंडळी देवीदारी येवुन सर्वसामान्य भाविकाप्रमाणे देवीदारी येवुन राजमाता जिजाऊ महाद्वार मधुन कुलधर्म कुलाचार करीत आहेत. आतापर्यंत पालकमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला, वडील निवृत्त शिक्षक  ज्ञानदेव भाऊसाहेब  लंके, आमदार निलेश लंबे यांचे चिरंजीव तेजेश व  शिवम तसेच बहीण वंदना गधांक्ते, भावजय सौ. जया दिपक लंके, श्रीकांत चौरे यासह अनेकांनी अधिक मासात देवीदारी येवुन देवीस साडीचोळी अर्पण करुन खणानारळाने ओटी भरुन व पुरण-वरणाचा नैवैदय  दाखवून  सवासनी घालुन विशेष म्हणजे हे सर्व विधी राजमाता जिजाऊ महाद्वार मधुन करुन केला आहे.

सध्या तिर्थ क्षेञी मंत्री, आमदार, खासदार,  लोकप्रतिनिधी व त्यांचे नातेवाईक अधिक मासातील वारी अर्पण करण्यासाठी गर्दी करीत आहेत. यापुढे ही दर्शनासाठी अशीच गर्दी अधिक मास संपेपर्यत वाढत राहणार आहे.

 
Top