तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचा यावर्षीचा शारदीय नवराञ महोत्सव संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविका विना पार पडणार आहे. 

दि. १७ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ महोत्सवास घटस्थापनाने प्रारंभ होणार आहे. तत्पुर्वी दि. ९ ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची मुख्य चलमुर्ती सिंह गाभाऱ्यातील शेज घरात मंचकी निद्रा होणार आहे. इतिहासात प्रथमच भाविका विना शारदीय नवरात्र महोत्सव होणार आहे. संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवात घटस्थापना, छबीना, अजाबली, धार्मिक विधी, सिमोलंघन आदीसह पारंपरिक विधी पुर्वी प्रमाणे होणार आहेत. यावेळी सेवेकरी, पाळीकर पुजारी, उपाध्ये पुजारी प्रत्येकी ५ जणांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी मंदिरात जाणाऱ्या पुजारी वर्गाची रँपिड अँटीजेन टेस्ट घेतली जाणार आहे. तर तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेच्या वेळी २५ भोपे पुजारी यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. सिमोलंघन सोहळ्यासाठी अहमदनगर नगर येथील पलंग पालखीचे मानकरी यांच्या मोजक्या मानकरी लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

श्रीक्षेत्र तुळजापुर नगरीत कोणताही भाविक येणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी बँरेकेटस लावुन कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तरी पुजारी वर्गानी आपल्या भाविकांना तुळजापुर ला येवू नका असे सांगण्यात यावे अशा सुचना पुजारी बांधवाना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.  श्री देवीजीस भाविकांच्या वतीने शहरातील नागरीक व पुजारी बांधवाच्या वतीने पंचामृत अभिषेक  सामुदायिक रित्या एकच होणार आहे.

तुळजापुर शहरातील व्यापारी, पुजारी वर्गाचे मोठे नुकसान 

चैत्र पोर्णिमाला संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे या वर्षी याञा होवु शकली नाही. त्यामध्ये आता शारदीय नवराञ महोत्सवाची भर पडली. यामुळे तुळजापुर शहरातील व्यापारी, पुजारी, सर्व सामान्य छोटे मोठे व्यापारी वर्ग श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरावरच अवलंबून असतात. संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे गेल्या सात महिन्यापासुन श्री क्षेत्र तुळजापुरला देवी दर्शनासाठी येत नसल्यामुळे तुळजापुर शहराची आर्थिक उलाढाल ठप्प झाली. त्यामुळे या वर्षी च्या नवराञ महोत्सवावर श्री देवी भक्तासह शहरातील पुजारी व्यापारी नागरीक यांच्या सर्वांच्या आशा मावळल्या आहेत.

 
Top