सांगवी : प्रवीणकुमार बाबर

देशभरासह राज्यातील जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असताना, अक्कलकोट तालुक्यापासून, अगदी ६ किलोमीटरवर हायवेलगत असलेल्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावे लागत असल्याचे विदारक चित्र सांगवीत पहावयास मिळत आहे.

कोणी गाडीवर, कुणी सायकलवर, तर कुणी चालत अशा साधनांचा उपयोग करत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करतानाचे चित्र सध्या सांगवीत पहावयास मिळत असून शेतात लाईट रात्र पाळी असली की भल्या पहाटे उठून पाणी आणण्यासाठी बालाजी ढाबा, अप्पाराव भोसले ढाबा, बंडाजी भोसले वस्ती, नागनाथ भोसले मळा, रेड्डी वस्ती, याठिकाणी दररोज सकाळी, सायंकाळी गर्दी होत असते. पाणी बदलून लहानपणापासून ते थोरांपर्यंत सर्दी, खोकला, यासारख्या अनेक प्रकारच्या आजाराला सामोरे जावे लागत असून सर्दी ,खोकला, झाला उपचारासाठी दवाखान्यात गेले की तिथे वेगळंच इलाज चालू केला जातो. त्यामुळे वारंवार पाणी बदलून सर्दी, खोकला, यासारख्या अनेक आजारांना तोड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या जीवितासा या दूषित पाण्यामुळे धोका झाल्यास याला जबाबदार कोण.? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. 

सांगवी गावात चार हातपंप आहेत. पण चारही हातपंपाचे पाणी दूषित असल्याने पिण्यायोग्य नाही. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या हातपंपामध्ये गतवर्षी टीसीएल ची पावडर ही त्यामध्ये टाकण्यात आली. पण याचा काहीच उपयोग झाला नसून, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, या चार ही हातपंपाच्या जवळ दलदली असल्याने पावसाचे पडलेले पाणी या हातपंपाच्या जवळच मुरत असल्याने तेच पाणी जमिनीच्या खालच्या भागात जाऊन  पाणी दूषित होण्यास मदत होते आणि हातपंपावर पाणी उपसा केल्यास हेच दूषित पाणी नागरिकांना प्यायला मिळते, असे गावातील नागरिकांचे म्हणणे असून, त्यावर ग्रामपंचायतिने काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करून पिण्याच्या पाण्याची सोय करावी , अशी मागणी महिला वर्गातून होत असून, दिवसभर रानात कामे करून यायची आणि पिण्याच्या पाण्यासाठी परत शेतशिवार फिरायचं असे किती दिवस चालणार...? 

असे किती दिवस पाण्यासाठी वणवण करावं लागणार अशी आर्तहाक ग्रामस्थांमधून पाहावयास मिळत असून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी गावातून जोर धरत आहे. 

ग्रामस्थांसाठी राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत लवकरच आर ओ फील्टर मशीन द्वारे शुद्ध पाणी देण्याचे नियोजन असून, सध्या त्या कामाचे आराखडा तयार असून लवकरच पूर्ण होऊन पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार असून,सध्या सिमेंट रस्ते, चेंबर यांसारखे कामे प्रगतीपथावर असून, पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरच होणार आहे.

ए बी ताड, ग्रामसेवक, सांगवी बु

सध्या गावातील अनेक विकास कामे सुरू असून, गावकऱ्यांच्या पिण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, आर ओ फिल्टर मशीन द्वारे संपूर्ण गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचा मानस आहे. 

अबूबकर शेख, सरपंच सांगवी बु

 
Top