तुळजापूर, दि. 03 : सास्तूर ता. लोहारा येथील शांताबाई मलिकार्जुन जगदे 74 यांचे तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर येथील मोतीझरा स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सुन व चार मुली , नातवंडे असा परिवार आहे. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांच्या त्या मातोश्री होत.
