काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना आँनलाइन शिक्षण दिले जात आहे. कोरोना व्हायरसने जगासह देशभरात धुमाकूळ घातलाय. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संस्थेचे अध्यक्ष  मनोहरपंत सपाटे व शालेय समितीचे चेअरमन मोहनराव गोरे व त्यांचे सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांसाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीची वेबसाईटवर घेऊन दिली.व त्या माध्यमातून प्रशालेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा नवा पर्याय शोधला.त्यामुळे येडेश्वरी कन्या प्रशालेतील सर्व विद्यार्थी घरी बसून आँनलाइन शिक्षण घेत आहेत. एकीकडे  देश कोरोनावर मात करण्यासाठी लढतोय तर देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थी आपल्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री सुनिल खेंदाड यांनी पालकांशी विचार विनिमय करून व ग्रामीण भागाचा विचार करून जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी कसे होतील याचा विचार करून तासाची वेळ सकाळी 7.30 ते 9.30 व सायंकाळी 7.00 पासून 9.00 पर्यत सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास असे इ.8 वी ते 10 वी च्या सर्व वर्गाचे व सर्व विषयाचे तास घेतले जात आहेत.

प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री सुनिल खेंदाड, सहशिक्षक श्री दिगंबर कदम,श्री किशोर बनसोडे, श्री. गणेश गुंगे,श्री तुकाराम गवळी हे सर्वजन दिलेल्या वेळेनुसार दररोज विद्यार्थ्यांना आँनलाइन मार्गदर्शन करीत आहेत. सर्व विद्यार्थी एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन या ऑनलाइन शिक्षणाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवत आहेत. विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणातील प्रतिसाद व जिद्द पाहून पुढील काळात विद्यार्थ्यांना यशस्वी शिखरावर जाण्यासाठी मदत करेल हेच या निमित्ताने स्पष्ट होत आहे. प्रशालेच्या वतीने देण्यात येत असलेल्या ऑनलाईन शिक्षणाचे  ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

 
Top