तुळजापूर : कुमार नाईकवाडी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक शामराव लोखंडे यांनी राज्यशास्त्र विषयात पीएचडी संपादन केली असून त्यांचे बालाघाट शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मध्ये प्रा श्रीरंग लोखंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील राजकीय विचारांचा विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर प्रबंध डॉक्टर हनुमंत भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकराव चव्हाण, संस्थापक सचिव माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर, कार्याध्यक्ष माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर, संचालक बाबुराव चव्हाण,संचालक  रामचंद्र आलुरे, प्राचार्य डॉ मोहन बाबरे , उपप्राचार्य डॉ नरसिंह जाधव, उपप्राचार्य प्रा रमेश नन्नवरे, सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, सिनेट सदस्य डॉ.गोविंद काळे, अधीक्षक धनंजय पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top