नळदुर्ग, दि. 22 : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील सामाजिक कार्यकर्ते निसर्ग सालेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या काळात रक्तपुरवठा कमी भासू नये म्हणून मित्र परिवाराने व ग्रामस्थांनी हे शिबीर आयोजित केले होते. डॉ.हेडगेवार रक्तपेढी सोलापूर व एस. ए. ओपिटिकल्स आणि आय क्लिनिक ,नळदुर्ग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वसंत सालगे ,दिलीप सालेगावे, संगमेश्वर पाटील, दगडू सालेगावे, युवा परीषद तालुका अध्यक्ष केदारनाथ पाटील, खंडू टिकंबरे, तुळशीराम घोडके, रोहित भुजबळ, सागर कबाडे, मंगेश आतकरे आदीजण उपस्थित होते.
या शिबिरात एकूण 42 लोकांनी रक्तदान केले. नेत्र तपासणी मध्ये एकूण 83 नागरिकांची तपासणी करण्यात आली. या वेळी प्रत्येक रक्तदात्यास मास्क, सॅनिटायझर देण्यात आले. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मित्र परिवाराने व ग्रामस्थांनी सहकार्य केले.