किलज : राम जळकोटे

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे मुसळधार पावसामुळे गावातील शेतीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होत. यामध्ये नदीलगत असलेल्या कुटुंबाची घरे ही पाण्यात वाहून गेली होती. यामध्ये या कुटुंबाना अनेक लोकप्रतिनिधी ,संस्था संघटना या मदतीसाठी धावून येत आहेत. त्याच पार्श्वभूमिवर  जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई शंकर बंडगर यांच्या माध्यमातून त्यांचे  सुपुत्र बालाजी बंडगर यांनी या आपत्तीग्रस्त कुटुंबाना संसार उपयोगी वस्तू दिल्या आहेत. या कुटुंबाना या कठीण काळात आधार देण्याचे काम बालाजी बंडगर यांनी केले आहे.

यावेळी माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, विविध सहकारी सोसायटी चेअरमन पंडित जळकोटे, निवृत्ती शिंदे, नागनाथ शिंदे, पंचायत समिती सदस्य, खंडेराव शिंदे, महेश माने, हमीद पटेल, नाना मुळे, धनराज  शिंदे, गणेश येलुरे, दत्ता सोमवंशी, रवी बंडगर, चंद्रकांत कोनाळे सह आदी आपत्तीग्रस्त कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top