तुळजापूर : कुमार नाईकवाडी
संसर्गजन्य कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तुळजापूरचे माजी उपनगराध्यक्ष कै. धन्यकुमार क्षिरसागर यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त युवा सामाजिक कार्यकर्ते दिनेशआण्णा क्षिरसागर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे गुरुवार दि. 22 गुरुवार रोजी आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात एकूण 78 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उदघाटन आनंद क्षिरसागर, पंकज पाटील, राजाभाऊ शिंदे, दिपक महामुनी, प्रवीण नाडापुडे, दिपक अग्रवाल, सज्जन जाधव आदीच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात एकूण 78 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तुळजापूर शहरातील श्री कृष्ण मंदिर कै धन्यकुमार काका क्षिरसागर दर्शन मंडप येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या तरुणांच्या आरोग्याची विशेष काळजी शिबिरात घेण्यात आली़. शिबीरस्थळी वारंवार सॅनीटायझरचा वापर करुन उपस्थितांचे हात निर्जंतूनीकरण केले जात होते. तसेच रक्तदान करण्यास आलेल्या प्रत्येक रक्तदात्यास एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिनेश क्षीरसागर, संदीप भोसले, अभिजित भोसले, सुरज गायकवाड, अतुल सोमवंशी, किशोर जाधव, अतुल साठे, अमीर बागवान, रोहित दरेकर, संकेत घोगरे यांनी परिश्रम घेतले. सोलापूर येथील सोलापूर ब्लड बँकेंच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले.