तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणाचे आराध्य दैवत असलेल्या तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यनगरीत गेल्या दोन वर्षापासुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या रखडलेल्या कामाबाबतीत खासदार छञपती संभाजी महाराज हे तुळजापुर नगरपालिका व प्रशासकीय यंत्रणेवर शुक्रवारी "मराठा क्रांती " मोर्चा च्या आयोजित जाहीर सभेत गरजले.
छञपती संभाजीराजे म्हणाले की, तुळजापुर शहरात छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या बाबतीत तुळजापुर नगर पालिका झोपली का? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का उभा करु शकत नाही ? मागच्या वेळी २ वर्षापूर्वी न.प. पालिकेस बोललो होतो. पुढच्या वेळी मी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शना करिता तुळजापुरला आल्यावर महाराजांचा पुतळा मला दिसला पाहिजे. नाहीतर माझ्याशी गाठ आहे, अशी तंबी दिली होती. येत्या चार माहिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तुळजापुरात उभारला नाही तर परत मी तुळजापुरला येवून १० दिवस मुक्काम करणार. अरे तुमच्याकडे छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळाबाबतीत वेळ नाही का? पैसे नाहीत का? आम्ही मराठा बांधव वर्गनी करुन गोळा करुन देवु द्या का सांगा? महाराजांचा पुतळा उभा करु शकत नाही काय कारण आहे. कुठे गेली प्रशासकीय यंञणा? जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी खासदार, आमदार, नगराध्यक्ष प्रशासकीय यंञणावर ताशेरे ओढले. या सर्वानी छञपती शिवाजी महाराज यांच्या रखडलेल्या कामाच्या पुतळ्या बाबतीत मला पञ पाठवून कळवावे नाहीतर तुळजापुर येथे येवुन आंदोलन करण्याचा पविञा घेणार असल्याचे सांगितले. यावेळी जमलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा बांधवानी टाळ्या वाजविल्या.

