नळदुर्ग, दि. 10 : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी ता. तुळजापूर येथील एसटीपीएल कंपनीच्या टोलनाक्यावर शासनाच्या नियमानुसार 20 कि.मी. अंतरावरील गावाना टोल माफी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी नळदुर्ग शहर शिवसेनेच्यावतीने शनिवार दि. 10 ऑक्टोबर रोजी अकरा वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. 

शासनाच्या नियमाप्रमाणे २० कि.मी. परिघाच्या आतील गावांना टोल माफी द्यावी, असा नियम असताना टोल नाक्यावर मोजक्याच अंतरावर असलेल्या गावातील वाहनांना पन्नास रुपये इतकी आकारणी करण्यात येत आहे. तसेच नळदुर्ग शहरापासून सोलापूर हे शहर जवळ असून या शहराशी नळदुर्गकरांचा दैनंदिन व्यवहार येतो. तसेच वैद्यकीय कारणास्तवही येथून शेकडो पेशंट सोलापूरला जात असतात. या टोल नाक्यामुळे नागरिकांवर नाहक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी शिवसेनेने धरणे आदोंलन  केले. यावेळी टोल विषयावर कंपनीच्या आधिका-यांशी शिवसैनिकानी सविस्तर चर्चा करून आपली प्रमुख मागणी सांगितली.

यावेळी नळदुर्ग शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, उपशहरप्रमुख शाम कणकधर, सोमनाथ म्हैत्रे, मीडिया प्रमुख सुनिल गव्हाणे, ग्राहक संरक्षण कक्षचे नेताजी महाबोले, कृष्णात मोरे,  अजय दासकर, आनंद काटकर, दिनेश बाळुकर ,गणेश मोरडे, अमित शेंडगे, लखन भोसले, उमेश जाधव, सचिन भोई, बाळ डुकरे, खय्युम शेख, कलीम शेख, रमिज सौदागर, शमा काझी, रियाज शेख, जितु चंदेले, बंडू कसेकर, शंकर भाळे, आसिफ शेख, मुद्दसर जहागिरदार यांच्यासह नळदुर्ग शहरातील वाहनमालक व चालकासह नागरीक सहभागी झाले होते. याप्रसंगी तुळजापुरचे नगरसेवक सुनील रोचकरी, पत्रकार विलास येडगे शिवाजी नाईक, सुहास येडगे, सचिन तोग्गी, आय्युब शेख, सोमनाथ बनसोडे, किरण कांबळे, लक्ष्मण दुपारगुडे आदीजण  उपस्थित होते.



यावेळी शिवसेनेच्यावतीने नळदुर्ग मंडळाधिकारी अमर गांधले, एसटीपीएल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आरजितदास गुप्ता, रमेश काळे, मॅनेजर शिवकुमार चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यानी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

 

 
Top