नळदुर्ग, दि. 10 : उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका मागासवर्गीय तरुणीवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्यावतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, हाथरस जिल्ह्यातील तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करणे ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या निंदनीय घटनेचा दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत असून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत मुलीच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला विश्वासात न घेता बेरात्री तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट करणाऱ्या संबंधित पोलीस आधिकारी व कर्मचारी यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे तुळजापूर तालुकाध्यक्ष उमेश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष पिंटू लोंढे, नळदुर्ग शहराध्यक्ष अमर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड, आशिष लोंढे सिद्धार्थ बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
