तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या नगरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार दि. २१ बुधवार रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेचे महाद्वार बाहेरुन दर्शन घेतल्यानंतर तुळजापुर नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा श्री देवीची प्रतिमा देवून सत्कार केला.

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, नगरसेवक विशाल रोचकरी आदींची उपस्थिती होती.

संसर्गजन्य कोरोनामुळे शहराची अर्थ व्यवस्था ढासळली आहे. शहरातील व्यापारी व पुजारी बांधवाचे मोठे हाल होत आहे. तरी श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर उघडावे तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजा शेतकऱ्यांचे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदत द्यावी, अशा प्रकारचे एक लेखी निवेदनही यावेळी देण्यात आले.

 
Top