तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. २१ रोजी पाचव्या माळे दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाद्वार बाहेरुन श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची यथासांग पुजा, आरती करुन दर्शन घेतले.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रावरील संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगावरचे संकट दुरु होवू दे, महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट टळल्यावर पुन्हा तुझ्या दरबारात दर्शनासाठी येणार, तसेच निसर्गच्या अवकृपेमुळे आलेले बळीराजावरचे संकट दुर होवू दे, माझ्या बळीराजा शेतकऱ्यांना या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ताकद दे, असे साकडे श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात माथा टेकवून घातले. या वेळी त्यांचे पारंपरिक पुजारी कुमार डिंगबराव इंगळे यांनी उद्वव ठाकरे यांची यथा सांग पुजा करुन आशीर्वाद दिला.
यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश निबांळकर, पालकमंञी शकंरराव गडाख, आमदार राणाजगजितसिंह पाटील. आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम, युवा सेनेचे सागर इंगळे, बापुसाहेब नाईकवाडी, अर्जुन सांळुके आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.