नळदुर्ग : एस.के. गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रँपीड टेस्ट करण्यात आली असून एकूण ५६ जणापैकी एकही पाँजिटीव्ह रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँकडाऊन काळात गावात ग्रा.प. च्या वतीने जंतूनाशक फवारणी, मोफत सँनिटायझरचे वाटप, थर्मल टेस्ट, आँक्सीमिटर टेस्ट, होमक्वरंटाईन, संस्थात्मक क्वायंटाईन, प्रबोधनपर रँली काढून कार्यक्रम आदी विविध उपक्रम आता पर्यंत राबविण्यात आले आहेत.

सध्या "माझे कुटुंब माझी जबाबदारी" म्हणत सरकारने अनलाँकडाऊन सुरु केले असले तरी काही अटी लागु केलेल्या आहेत. गावा गावात कोव्हिड-१९ रँपीड टेस्ट शासनाच्या वतीने मोफत करण्यात येत आहे. दि. २१ ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशक वैद्यकीय अधिकारी डॉ.यशवंत नरवडे यांनी शासनाच्या वतीने वागदरी ता.तुळजापूर येथे रँपीड टेस्ट केली असून यावेळी ४१ पुरुष व १५ महिला असे एकूण ५६ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी एकही पाँजिटीव्ह रूग्ण आढळला नाही. 

याप्रसंगी आरोग्य सेवक कुलकर्णी, आरोग्य सेविका गायकवाड, आरोग्य सहनिरिक्षक हुकीरे, ग्रामसेवक जी.आर.जमादार, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, उपसरपंच दत्ता सुरवसे, अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनबाई पवार, मदतनीस रुपाली जाधव  उपस्थित होते. सध्यस्थितीत वागदरी गाव हे कोरोना मुक्त असल्याने ग्रमस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे.

 
Top