मुरूम, दि. 18 : उमरगा तालुक्यातील मुरुम येथील कुमारी अनुजा चलपते यांनी मुरूम परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक समस्या, नवीन कृषी ॲपचा वापर कसा करावा, पिकांवरील कीड रोग ओळख-लक्षणे, बीज प्रक्रिया, निंबोळी अर्क तयार करणे अशा प्रात्यक्षिकाद्वारे शनिवार (दि.१७) रोजी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

सध्या कु. अनुजा चलपते ही यशवंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संलग्नित बोर्डीकर कृषी महाविद्यालय, सेलू येथे कृषी पदविका अभ्यासक्रमास शिकत असून ग्रामीण कृषी जागरूक व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२० अंतर्गत या परिसरातील  दिपक शिंदे, विश्वनाथ पाताळे, गोविंद माळी, सुधाकर देडे, बिभीषण बंडगर, विठ्ठल चलपते आदी शेतकऱ्यांना विविध प्रश्नांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

 
Top