चिवरी : राजगुरु साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात शनिवारी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून विधिवत घटस्थापना करण्यात आली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने व ग्रामपंचायतीने यावर्षीचा नवरात्र महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नळदुर्ग पासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर बालाघाटच्या डोंग कुशीत चिवरी महालक्ष्मी हे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी नवरात्रोत्सवात नव्हे तर वर्षभर भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे मंदिर परिसरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. यामुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी घरीच देवीची प्रतिष्ठापना करून, पूजा, अर्चा, नैवेद्य दाखवून नवरात्र उत्सव साजरा करावा, असे आवाह देवस्थान ट्रस्ट व पुजारी मंडळाकडून करण्यात आली आहे.
दि. 15 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत, कोरोना सहाय्यता कक्ष, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट ,पुजारी मंडळ यांच्या बैठकीत उपरोक्त निर्णय झाला. त्यामुळे मंदिर बंद असताना भाविकांनी दर्शनासाठी येऊन फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करू नये व प्रशासनास सहकार्य करावे.
- गोरोबा गायकवाड, ग्रामसेवक