मुरूम, दि. 18 : येथील जिल्हा परिषद प्रशालेची विद्यार्थीनी कुमारी समृद्धी किसन गावडे हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशाले पात्र ठरली आहे.
तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक हनुमंत शिंदे, सहशिक्षक तुकाराम कुंभार, सहशिक्षीका प्रमिला तुपेरे, निर्मला यादव, रेखा निंबाळकर, संगिता माने, प्रविण ठाकूर आदींनी तिचे विशेष अभिनंदन केले.