खानापूर : बालाजी गायकवाड
चित्रा नक्षत्राच्या धुवाधार पावसाने तुळजापूर तालुक्यातील केशेगाव परिसरातील शेतीला मोठा फटका बसला आहे.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतात पाणी जाऊन व पिके वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
येथील ऊस ,सोयाबीन ,कांदा यासंह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सोयाबीन कापणी व मळणी सुरु असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून रचलेल्या बनमित पाणी शिरून बनिमी वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.तसेच पाण्याच्या प्रवाहाने ऊस मोठ्या प्रमाणावर आडवा पडला आहे.
येथील शेतकरी शांतप्पा यशवंत पाटील व राजशेखर जगन्नाथ पाटील यांच्या शेतातील पंधरा एकरावर असलेले सोयाबीन,पाच एकर ऊस व दोन एकर कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.यांच्यासह केशेगाव शिवारातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने याची तात्काळ दाखल घेऊन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येथील युवा शेतकरी यशवंत पाटील यांनी केली आहे.

