उस्मानाबाद : महेश पाटील

तालुक्यातील बेंबळी मंडळात परतीच्या पावसाने शेतकरी बांधवांचा हाताला तोंडाला आलेला घास हिरावला आहे. शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिक काढून शेतात मळणीसाठी ढिग शिवारात झाकून ठेवली. मात्र गेल्या तीन दिवसापासून पावसाने झोडपून काढल्याने सोयाबीन उभ्या पिकात पाणी आले असून ढिगा-या खाली पाणी गेल्याने भिजून नुकसान झाले आहे.

ऊसाचे फड ही जमीन दोस्त झाले. तसेच सोयाबीनचे ढिग जोरदार पावसाने बहूतांश ठिकाणी वाहून गेले. त्यामुळे शेतकरी बांधवांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्यो पिकाचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी बेंबळी येथे तलाठी यांना भेटून निवेदन दिले.  यावेळी तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख यांनी कृषी सहाय्यक यांना आपल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शेतकरी बांधवासह सर्व शिष्टमंडळ तात्काळ पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठवण्यास सांगितले. 

बेंबळी मंडळातील परतीच्या पावसाने झालेल्या सोयाबीन, ऊस, कोथिंबीर पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, असे तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख यांनी तुळजापूर लाईव्ह शी बोलताना सांगितले.

 
Top