कळंब, दि. २३ : सन 2017 मधील कृष्णा गोरोबा इंगोले या बालकाच्या खुनाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक- श्री सुनिल नेवसे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला क्र. 31 / 2017 ची सुनावनी उस्मानाबाद सत्र न्यायालय क्र.- 1 श्री. एम.जी. देशपांडे यांच्या समोर झाली. यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ते श्री. एस.एस. सुर्यवंशी यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. यातून सदर खटल्याचा निकाल आज दि. 23.10.2020 रोजी जाहिर होउन आरोपी- 1) उत्तम भिवाजी इंगोले, वय 50 वर्षे 2) उर्मीला उत्तम इंगोले 3) लखन श्रीरंग चावडेकर उर्फ राहुल 4) लक्ष्मी बाबु पोळ उर्फ द्रौपदी 5) साहेबराव प्रल्हाद इंगोले 6) सुवर्णा दिपक भडाले, सर्व रा. पिंपळगांव (डोळा), ता. कळंब यांना भारतीय दंड संहीता कलम- 34, 120 (ब), 302, 363, 364 सह महाराष्ट्र नरबळी, अमानवी, अघोरी कृती व काळा जादू प्रतिबंधक कायदा कलम- 3 (2) च्या अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात येउन खालील शिक्षा सुनावन्यात आल्या.-
वरील सर्व आरोपींना भा.दं.सं. कलम- 302, 34 च्या अपराधाबद्दल आजन्म कारावासासह प्रत्येकी 3,000 ₹ दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त साधा कारावास.
भा.दं.सं. कलम- 363, 34 च्या अपराधाबद्दल 7 वर्षे सश्रम कारावासाची व प्रत्येकी 2,000 ₹ दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त साधा कारावास.
भा.दं.सं. कलम- 364, 34 च्या अपराधाबद्दल आजन्म कारावासाची व प्रत्येकी 3,000 ₹ दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त साधा कारावास.
महाराष्ट्र नरबळी, अमानवी, अघोरी कृती व काळा जादू प्रतिबंधक कायदा कलम- 3 (2) च्या अपराधाबद्दल 7 वर्षे सश्रम कारावासाची व प्रत्येकी 2,000 ₹ दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त साधा कारावास. अशा शिक्षा सुनावल्या असुन या सर्व शिक्षा आरोपींनी समवर्तीपणे (एकाच वेळी) भोगायच्या आहेत. ठोठावण्यात आलेल्या एकुण 60,000 ₹ दंडा पैकी 30,000 ₹ रक्कम ही मयत बालक- कृष्णा याचे आई- वडील सारिका व गोरोबा इंगोले यांना नुकसानभरपाई म्हणुन दिली जाणार आहे.