तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि.23 शुक्रवार रोजी सातव्या माळे दिनी श्री देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी श्री तुळजाई नगरी भाविकांच्या गर्दीने गजबजली. श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात महाद्वार बाहेरुन कळस दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती. शहरातील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. बाजार पेठा मध्ये प्रासादीक साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी झाली.
शुक्रवारी सातव्या माळे चे औचित्य साधुन श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात भवानी तलवार अलंकार महापुजा मांडण्यात आली होती. छञपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी होती. शिवाजी महाराज यांचा श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेवर अपार श्रद्धा होती. श्री तुळजाभवानी मातेस छञपती शिवाजी महाराजानी सोन्याची नाणी, मोती,पोवळे, सुवर्ण अलंकार अशा विविध वस्तु दिल्या आहेत. आजही मंदीर संस्थानच्या वतीने छञपती महाराजानी दिलेले मौल्यवान दागिने शारदीय नवराञ महोत्सवात, शाकभंरी नवराञ महोत्सवात गुडी पाडवा, आदीसह विविध वर्षभर होणाऱ्या सणावाराना हे दागिने घालतात. तसेच छञपती शिवाजी महाराजांना यांना दृष्टांत देणारी, श्री तुळजाभवानी तसेच युद्धा मध्ये यशस्वी होण्यासाठी याच श्री तुळजाभवानी मातेने भवानी तलवार दिली होती, अशी अख्यायिता आहे. म्हणून भवानी अलंकार महापुजा मांडण्यात आली होती.
ततपुर्वी पहाटे श्री देवीचे चरण तिर्थ होऊन सकाळी पंचामृत दुग्धा अभिषेक करुन श्री देवीजीस हिरे जडीत वस्ञोअलंकार शालु (पैठणी) परिधान करण्यात आले. यानंतर श्री देवीजीस छञपती शिवाजी महाराजानी दिलेले मौल्यवान दागिने घालण्यात आले. गाभाऱ्यात श्री तुळजाभवानी माता छञपती शिवाजी महाराज यांना तलवार देताना चांदीची मुर्ती प्रतिकात्म स्वरूपात मांडून दृश्य मांडण्यात आले होते. यानंतर धुप आरती करवुन अंगारा काढण्यात आला. शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातव्या माळेची नित्योपचार पुजा करवुन सिंह गाभाऱ्यातील घटास ७ व्या माळेची फुलाची माळ घालण्यात आली.
या वेळी श्री तुळजाभवानी मातेचे महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, पाळीचे मुख्य भोपे पुजारी अभय आरुण पाटील, बुबासाहेब पाटील, दिनेश परमेश्वर, अजित परमेश्वर, संजय सोंजी, समाधान परमेश्वर, अतुल मलबा, प्रशांत सोंजी आदीसह मुख्य भोपे पुजारी बांधवानी श्री तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापुजा मांडली. या धार्मिक पुजेच्या सोहळ्या दरम्यान श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे तहसीलदार सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, पाळीकर पुजारी, भोपे पुजारी आदीची उपस्थित होती.
शारदीय नवराञ महोत्सवाच्या धार्मिक सोहळ्याची नित्योपचार पुजा सकाळी व संध्याकाळी करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रक्षाळ पुजेस प्रारंभ होवून श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात सातव्या माळेचा छबिना काढण्यात आला. श्री तुळजा दरबारात संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगामुळे मोजक्याच पुजारी बांधवाच्या व सेवेकरी यांच्या उपस्थित शारदीय नवराञ महोत्सवाची दररोज नित्योपचार करण्यात येत आहे. दि.24 शनिवार रोजी दुर्गाष्टमी दिनी महिषासुर मर्दिनी अलंकार महापुजा व दि. 25 रविवार रोजी खंडे महानवमी होमावर धार्मिक विधी संपन्न होणार आहे. रविवारी घटोथ्यापन होणार आहे. दि.26 सोमवार रोजी पहाटे सिमोल्घंन होणार आहे.
शुक्रवारी तुळजापुरात संसर्गजन्य कोरोना च्या पार्श्वभूमीवर महसुल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, न.प.प्रशासन कोंडमल्याचे दिसुन आले. सामाजिक अंतराचा फज्जा उडाला. तुळजापुरात आलेल्या लोकांना ना मास्क ना भिती असे चिञ दिसत होते. नवराञ महोत्सवाच्या अगोदर प्रशासनानी मोठा गाजावाजा केला होता. तो फोल झाल्याचे चिञ पहावयास मिळाले.
तुळजाभवानी मंदीराकडे येणारे रस्ते सर्व खुले करण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात महाद्वार समोर मोठी गर्दी झाली होती.