तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबातील पहाटे चरण तिर्थ सेवा करणाऱ्या श्री तुळजाभवानी चरण तिर्थ मंडळाकडून प्रत्येक वर्षी शारदीय नवराञ महोत्सवाच्या दरम्यान येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद (आल्पोहार) व्यवस्था मोफत करण्यात येते. माञ या वर्षी संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाचे सावट असल्यामुळे श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर भाविकासांठी बंद असल्यामुळे आम्ही या वर्षी च्या नवराञ महोत्सवात महाप्रसाद अल्पोहार करु शकलो नाही म्हणून श्री तुळजाभवानी चरण तिर्थ सेवा करणाऱ्या ५३ लोकांनी वर्गनी जमा करुन कोवीड १९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ लाख २८ हजार चारशे रुपयाचा धनादेश श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल वित विभागातील तहसीलदार माने यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला.
या वेळी श्री तुळजाभवानी चरणतिर्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता भोसले, कोषाध्यक्ष सुभाष लांडगे, नागनाथ घोडके, गणेश देशमुख आदीसह चरण तिर्थ सेवा करणारे नागरीक उपस्थित होते.