जळकोट : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव-नळदुर्ग रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता नव्याने  डांबरीकरण करण्याची मागणी लोहगाव ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांनी सर्वजनिक बांधकाम उपविभागाचे  कनिष्ठ अभियंता राजेंद्र माळी यांच्याकडे निवेदनाद्वरे  केली आहे.


तुळजापूर तालुक्यातील लोहगाव-नळदुर्ग  रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे  खड्यासह  खड़ी उघडी पडली आहे.तर काही ठिकाणी चिखलाचे  साम्राज  पसरले आहे. यामुळे नागरिकांसह  वाहनधारक प्रवाशांना  नाहक ञास सहन करावा लागत आहे.  रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्डे पडल्याने  खड्डयात  पावसाचे पाणी साचून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. आलियाबाद पुलापासून ते रामतिर्थ देवस्थान पर्यंतचा  सातशे मिटरचा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात  खड़ी उघडी पडली असून चिखलाचे साम्राज पसरल्याने  दुचाकी घसरून   होणाऱ्या अपघातात दिवसेनदिवस  वाढ होत आहे. तरी बांधकामविभागकडून याची तात्काळ दखल घेवून नुसती दुरूस्ती न करता नव्याने लोहगाव ते नळदुर्ग रस्ता डांबरीकरण करावे. तसेच  साईडपट्टीवरील झाडाझुडपासह अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांनी केली आहे.

 
Top