जळकोट : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे दि. 8 रोजी राष्ट्रीय महामार्गावरील उषानिल पेट्रोलपंपाजवळ केवळ महामार्गाच्या अर्धवट कामामुळे ट्रक व कार यांचा अपघात झाला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातास जबाबदार धरून नवगिरे यांनी रस्त्याचे अर्धवट काम केलेल्या टोल कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना हायवे पोलीसांमार्फत बोलावून घेऊन महामार्गाचे सर्वच ठिकाणी काम अपूर्ण असताना टोल वसूल का करता? जिल्ह्यातील लोकल वाहनांना टोलमध्ये ५०% सवलत का देत नाहीत? या महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे वारंवार घडणाऱ्या अपघात व त्यामुळे होणाऱ्या जीवीतहानीस जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न विचारून फैलावर घेतले. यावेळी जमाव आक्रमक झाल्याचे दिसले. 

संबंधित टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणचे काम तातडीने सुरू करण्यात येईल. स्थानिकांच्या वाहनांची टोल रक्कम कमी करू.याबाबत आम्ही टोल कंपनीच्या वरिष्ठांशी बोलून  त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 

 या प्रसंगी हायवे पोलीस निरीक्षक सुतार, त्यांचे सहकारी, पोलीस कर्मचारी, जळकोट गावातील वाहन चालक मालक, नागरीक उपस्थित होते.

 
Top