सोलापूर, दि. 8 : जय गायकवाड
जिल्ह्यातील हिरज येथील रहिवासी असलेले समाज प्रबोधनकार, "आंबेडकरी एक्स्प्रेस"या कॅसेटचे गीतकार/गायक बुद्धवासी बाळ शिवबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणा दिनानिमित्त खेड्यापाड्यातील तमाम कलावंताच्या वतीने गितगायन करून या महान कलावंताला गीत सूमनांजली वाहण्यात आली.
बाळ शिवबा गुरूजी यांनी बुध्द, फुले, शाहु, छ. शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, आण्णा भाऊ साठे आंबेडकरी चळवळीतील अनेक गीते स्वतःलिहून गीत गायन केले आहे. समाजातील प्रत्येक बांधवांना मार्गदर्शन करून समाज घडवण्याच कार्य गुरूजींनी आयुष्याच्या शेवटपर्यंत केले. शशीकांत सलवदे,बापू सलवदे,श्रीकांत सलवदे,नंदा कांबळे असा त्यांचा परीवार आहे. पण दादा गेल्या नंतर या लेकराने शाहिरी पणा सोडला नाही. सोलापूर जिल्ह्यातील तमाम कलावंताना आपल्या वडिलांनी लिहलेल्या गीतांचा संच देऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाची शिदोरी वाटप केले आहे.
"प्रेमळ सिंधू सावली जिवनातुन मावळली"अशी काळजाला भिडनारे अनेक गीते गुरूजीचे आहेत. पण गुरूजींच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्यातील कलाकार पोरका झाला आहे. अशी चर्चा या कार्यक्रमा वेळी उपस्थित कलाकार करित होते.
